PurohitsanghSanstha

 

नारायण नागबली पूजा त्र्यंबकेश्वर


भारतामध्ये एकूण १२ ज्योतिर्लिंग आहेत.  त्यापैकी एक जगप्रसिद्ध म्हणजे नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग.यास कारण फक्त ह्या ज्योतिर्लिंगाच्या भगवान ब्रम्हा, विष्णू, महेश हे एकत्रित ज्योतिर्लिंग रूपाने विद्यमान आहेत. त्रिमूर्तींचा वास असल्याने हे स्थान भक्तांचे मनोकामना पूर्ण करणारे असे स्वर्गच म्हटले जाते.    येथे त्र्यंबकेश्वर मंदिर हे महादेवांना समर्पित आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी स्थित आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात काही महत्वपूर्ण पूजा(विधी)  केल्या जातात.  ते फक्त ताम्रपत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर मधील अधिकृत पुरोहितांकडे  पूजा करण्याचा अधिकार प्राप्त आहे. त्यांना ताम्रपत्रधारी गुरुजी म्हटले जाते.  ताम्रपत्राचे संरक्षण व अधिकृतरित्या प्रमाणपत्र देण्याचे अधिकार फक्त त्र्यंबकेश्वरमधील पुरोहित संघ ह्या संस्थेकडे राखीव आहे.  पुरोहितसंघ संस्था मागील १२०० वर्षांपेक्षा जास्त काळ सेवारत आहे. आणि येथे होणाऱ्या विधींना आणि ताम्रपत्रधारी गुरुजींना पूजा करण्याची सर्वोच्च न्यायालयाची पूर्णतः मान्यता असून पुरोहित संघ संस्थेकडे पूर्ण अधिकार आहेत. 

कुशावर्त तीर्थावर तसेच ताम्रपत्रधारी गुरुजींच्या निवासस्थानी नारायण नागबळी पूजा, काळसर्प दोष पूजा, त्रिपिंडी श्राद्ध, रुद्राभिषेक पूजा ,रुद्रयाग, कुंभविवाह, अर्कविवाह, महामृत्यंजय मंत्र जाप, विधी यासारख्या अनेक धार्मिक विधी शास्त्रानुसार पद्धतीने ताम्रपत्रधारी गुरुजींकडून केल्या जातात.


नारायण नागबली पूजा

नारायण नागबली पूजा हि दोन वेगवेगळ्या पूजांचे एकत्रीकरण आहे. ज्यामध्ये नागबळी पूजा व नारायण बळी पूजा यांचा समावेश आहे. ह्या दोन्ही पूजा नारायण नागबळी पूजा म्हणून एकत्रितच केल्या जातात.  आपल्या पूर्वजांपैकी एखाद्या व्यक्तीची मृत्यू कुठल्या कारणाने झाली आहे हे निश्चित प्रमाणे माहिती नसते. त्यामुळे असे पूर्वज मृत्यू लोकांत भटकत असतात परिणामी त्यांना पितृदोषाला सामोरे जावे लागते ह्या क्रियेमध्ये व्यक्तीचे नाव अथवा गोत्राचा उच्चार वर्ज्य आहे . त्यामुळे हि पूजा फक्त त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग परिसरातच केली जाते. जिथे भगवान ब्रम्हा, विष्णू  व महेश हे ज्योतिर्लिंगाच्या रूपाने जागृत आहेत. 

नागबळी पूजा - जेव्हा एखाद्या व्यक्तीचा नकळत अचानक मृत्यू होतो. तेव्हा अशा व्यक्तीचा आत्मशांती प्रित्यर्थ नारायण बळी पूजा करावी असा शास्त्रांमध्ये उल्लेख केला आहे. हि पूजा न केल्यास श्राद्ध केले तर ते अंतरिक्षात वाया जाते. 

नागबली हा सापाच्या दोषातून मुक्त करण्यासाठी केला जाणारा एक विधी आहे. संततीप्राप्ती होणे आणि कफ, पित्त, वारा, ताप, खाज सुटणे आणि ओटीपोटात रोग यासारख्या आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त असणे अशा विविध समस्यांद्वारे सर्पदोष  ओळखला जातो.


एखाद्या व्यक्तीला दुर्मरण कोणत्याही प्रकारे येऊ शकते. जसे कि :

-  वीज अंगावर पडली असेल 

-  डोंगरावरून अथवा पर्वतावरून पडल्याने 

-  अपघात झाले असल्यास 

-  पाण्यात बुडल्याने 

-  झाडावरून किंवा उंचावरून पडल्यास 

-  प्राण्यांच्या हल्ल्याने.

-  आत्महत्या झाल्याने.

-  खून झाल्याने.

-  अग्नीने जळून मरण आले असेल.

-  शॉक लागून मरण आले असल्यास.

-  उपासमारीने मरण झाले असेल.

-  शापाने मरण आले असल्यास.

-  महामारी जसे कोरोना, कोलेरा (पटकी) मुळे मरण आले असल्यास.


नारायण नागबळी पूजा का करावी ?

नागबळी पूजेचे अनुष्ठान नाग हत्येच्या पापातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी केली जाते. जेव्हा एखादी व्यक्ती नागाची हत्या करते अथवा त्यात सहभागी असते. तेव्हा अशा व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तर अशा व्यक्तीने या पापाचे समाधान शोधण्यासाठी नागबळी पूजा करावी. 


नारायण नागबळी पूजा विधी :


नारायण  नागबळी पूजेला तीन दिवसांचा कालावधी लागतो. ज्यात पुढीलप्रमाणे धार्मिक क्रिया केल्या जातात.


श्राद्धकर्त्याला कुशावर्त तीर्थावर स्नान करून नवीन वस्त्रे धारण करावी लागतात.

पुरुषांनी धोती, कुर्ता तसेच स्त्रियांनी पांढरी साडी नेसावी.

पुरुषाला एकट्याने हा विधी करता येतो परंतु स्त्रीला एकट्याने हा विधी करता येत नाही.

पूजेचा संकल्प घेऊन मग न्यास करावा. तदनंतर कलश स्थापन केले जाते.

कलश स्थापना करताना गुरुजी श्री विष्णु व यमाचे पूजन केले जाते.

विष्णु तर्पण तसेच प्राणप्रतिष्ठा, अग्निस्थापन, पुरुषसुक्त हवनादि करून श्राद्धकर्मे केली जातात.

पूजेच्या अंतिम दिवशी श्री गणेशांचे पूजन केले जाते आणि सर्व पूजा निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल आभार मानले जाते.

नागांच्या सुवर्ण प्रतिमांचे पूजन केले जाते.

गुरुजींना दान-दक्षिणा दिली जाते.

अंतिम विधी श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन व पूजन करून मग पूजेची सांगता होते.


नारायण नागबळी पूजा त्र्यंबकेश्वर मध्ये का करावी ?

नारायण नागबळी पूजा मंदिराच्या पूर्व दरवाज्याला असलेल्या अहिल्या गोदावरी मंदिर तसेच सतीचे महास्मशान इथे केली जाते. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे ब्रह्मा-विष्णु-महेश ह्या त्रिदेवांचे एकत्रित स्वरूप असलेले विशेष ज्योतिर्लिंग आहे.


नारायण नागबळी पूजेचे फायदेः

उत्तम आरोग्य प्राप्त होते

पितृदोष नष्ट होतो

पितृदोषापासून उत्पन्न होणारे हानिकारक प्रभाव नष्ट होतात

संतती होण्यास प्रतिबंध दूर होतो

नाग स्वप्नात दिसणे बंद होते

कौटुंबिक समाधान लाभते

व्यवसायात आर्थिक वृद्धी होते

नोकरीत पदोन्नती होते



 पता : श्री गंगा गोदावरी मंदिर, पहली मंजिल, कुशावर्त तीर्थ चौक,
त्रिंबकेश्वर - 422212. जिला: नासिक (महाराष्ट्र)पंडितजी info@purohitsangh.org www.purohitsangh.org

Trimbakeshwar Jyotirlinga nashik 

 info@purohitsangh.org